मद्य पाजून तरुणाला भोकसले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शिर्डी : जुन्या वादातून शिर्डीतील एका तरुणाला मद्य पाजवून त्याची धारदार शस्त्राने भाेसकून हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. 

मनोज भीमा पाईक (२१) असे तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा खून झाला. पोलिसांनी १० जणांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, मनोज पाईक याच्यावर धारदार शस्त्राने वार झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. 

फेब्रुवारीत रमेश वायदंडे व मनोज पाईक यांचा वाद झाला. हे प्रकरण मिटवण्यात आले होते. मंगळवारी रात्री सप्ताह मैदानावर मनोजला बोलावून घेण्यात आले. त्याला मद्य पाजून साथीदारांच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करून ठार करण्यात आले.

शिर्डी पोलिसांनी आकाश मोहन शेजवळ, साईशुभम बाळासाहेब मोरे, सागर विठ्ठल मरसाळे, रमेश तान्हाजी वायदंडे, किरण बबन सोळसे, आकाश अशोक अरणे, रोहित नाना वीर, उमेश तान्हाजी वायदंडे, संजय दिलीप रायपूत, सागर हातांगळे या १० जणांना अटक केली. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24