श्रीगोंद्यात अंगणवाडी सेविकेला मारहाण.

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदा :- तालुक्यातील एका अंगणवाडी सेविकेला तिने पाच महिन्यांपूर्वी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीचा राग येऊन, ज्या व्यक्तिविरोधात तिने तक्रार दिली होती. त्याच्यासह नऊ जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुण तिच्या दुचाकीची मोडतोड करून नुकसान केल्याची घटना दि.१६ रोजी सायंकाळी घडली होती.

यावेळी वाद सोडवण्यासाठी मधे पडलेल्या अंगणवाडी सेविकेचा मुलगा व मैत्रिणीला देखील मारहाण करण्यात आली. सदर अंगणवाडी सेविका महिला अनगर येथे उपचार घेत असल्यामुळे आज दि.२१ रोजी या महिलेने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात फिर्याद दिली असून, संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींमध्ये ४ महिलांचा समावेश आहे. तालुक्यातील एका गावात आपल्या मुलासह राहणाऱ्या एका अंगणवाडी सेविकेने चार ते पाच महिन्यांपूर्वी त्यांच्या गावातील एका व्यक्तिविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती त्याचा राग मनात धरून

दि.१६रोजी सायंकाळी ही महिला आपल्या मुलासह तिच्या घरासमोर उभी असताना पोपट बाजीराव रसाळ, वामन रोहीदास भदे, तुषार जनार्धन काळे, प्रशांत जनार्धन काळे, टिलू काळे यांच्यासह चार महिलांनी एकत्रित येऊन या अंगणवाडी सेविकेला केसाला धरून पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करत.

जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच भांडणे सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या या अंगणवाडी सेविकेच्या मुलाला व मैत्रिणीला देखील या लोकांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच अंगणवाडी सेविका व तिच्या मैत्रिणीच्या दुचाकींची तोडफोड करून नुकसान केले. या भांडणात अंगणवाडी सेविका असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24