अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : सहकारमहर्षी काष्टी संस्थेतील भगवानराव पाचपुते व त्याच्या संचालक मंडळाने २००५ पासून केलेल्या गैरकारभाराची दहा प्रमुख मुद्यांवर चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागवडे कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते व प्रा. सुनील माने यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
ज्यांनी ही संस्था उभी करुन वाढवली ते जेष्ठ नेते शिवरामआण्णा पाचपुते यांचे नुकतेच निधन झाले. भगवानराव पाचपुते मनमानीपणा करुन समाजहितापेक्षा स्वार्थ ठेवून कारभार करत आहेत.
आता त्यांच्या मुलाचे प्रताप वाढले आहे. याचे पुरावा आमच्याकडे असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी राकेश पाचपुते व सुनील माने यांनी केली.
त्यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष कैलासर पाचपुते, संचालक सर्जेराव पाचपुते, माजी संचालक काशिनाथ काळे, दत्तात्रय गेणबा पाचपुते, प्रकाश शिवराम पाचपुते, प्रकाश साहेबराव पाचपुते, पोपटराव पाचपुते, मधुकर क्षीरसागर, दिलीप कोकाटे उपस्थित होते.
सव्वा दोनशे कोटींचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या सहकार महर्षी काष्टी संस्थेचा कारभार चुकीचा असता, तर महाराष्ट्र व भारत सरकारकडून आम्हांला पुरस्कार मिळाले असते का, असा सवाल संस्थेचे मार्गदर्शक संचालक भगवानराव पाचपुते यांनी आरोप करणाऱ्या विरोधकांना केला आहे.
ते म्हणाले, माझ्यामुळे संस्थेची भरभराट झाली. ज्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले, त्यांनी स्वतःच्या जमिनीवर मोठे कर्ज घेऊन उधाऱ्या केल्या. माझा कारभार स्वच्छ आहे, हेच त्यांना पाहवत नाही.
कारभार चांगला नसता, तर सभासदांना पंधरा टक्के लाभांश व कर्मचाऱ्यांना ३६ टक्के बोनस मिळाला नसता. निवडणूक जवळ आल्यामुळे हे विरोधकांचे आरोप सुरु आहेत. कुठेही जाऊन चौकशी करा, माझी तयारी आहे, असे भगवानराव पाचपुते म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews