लग्न केले नाहीतर जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदा :- तालुक्यातील सांगवी दुमाला परिसरात राहणाऱ्या २३ वर्ष वयाच्या तरुणीशी गोड बोलून प्रेमसबंध केले. तू माझ्याशी लग्न केले नाहीतर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करुन घेवून तुझ्या कुटुंबाचे नावे चिठ्ठीत लिहून ठेवील, असे धमकावून आरोपी लखनकुमार काकडे, रा. सांगवी दुमाला याने इच्छेविरुद्ध वेळोवेळी जबरदस्तीचे शरीरसंबंध करुन बलात्कार केला.

इतर आरोपींनी त्याला मदत केली.आरोपींनी संगनमत करुन तरुणीला वीष पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. व जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिली.

याप्रकरणी काल पिडीत तरुणीने श्रीगोंदा पोलिसांत तक्रार दिल्यावरुन आरोपी लखन कुमार काकडे, लक्ष्मण अण्णा नलगे, सुधीर नलगे, भाऊ नलगे, कुमार काकडे, शुभांगी नलगे, स्नेहल काकडे, भोसले, सर्व रा. सांगवी दुमाला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24