अहमदनगर : तुझ्या पतीला जेलमधून सोडवण्यासाठी किती खर्च आला.अशी विचारणा करत शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे घडली.
या घटनेत कविता सागर पवार व शकुंतला याद्या पवार या दोघी जखमी झाल्या आहेत.याप्रकरणी कविता पवार यांच्या फिर्यादीवरून शेख याद्या पवार सुविधा शेख पवार या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की,यातील आरोपींनी फिर्यादी महिलेस तुझ्या पतीस जेलमधुन सोडवण्यासाठी किती खर्च आला. असे म्हणून कुऱ्हाडीचा दांडा व लाथाबुक्याने डोक्याला, हातावर, पायावर मांड्यावर मारून फिर्यादीचे डोक फोडून जखमी केले.
या दरम्यान फिर्यादीची सासू भांडणे सांडवण्यासाठी मध्येआली असता तिला देखील लाथाबक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत किवता सागर पवार यांच्या फिर्यादीवरून शेख याद्या पवार,सुविधा शेख पवार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.