श्रीगोंद्यात सहा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ,तालुका तीन दिवस पूर्ण लॉकडाऊन !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आतापर्यंत नगर जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे, आतापर्यंत जिल्ह्यातील काही तालुक्यात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील 6 व्यक्ती हे कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आले असल्यामुळे त्यांना आज सिव्हिल हॉस्पिटल येथे तपासणी साठी पाठविण्यात आले आहे.

श्रीगोंदे तालुक्यात आतापर्यत चार संशियत रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. या चौघांचीही चाचणी निगेटिव्ह आली असतानाच आज पुन्हा सहा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

हे सहा रुग्ण तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातील असून, हे सहाजण नगर येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते. या सहाही संशयित रुग्णांना नगर येथे पाठविण्यासाठी आरोग्य विभागाने पूर्ण तयारी केली आहे. हे रुग्ण नगर येथे दाखल होताच त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले जाणार आहे.

ही बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून रस्त्याने फिरणाऱ्या लोकांवर नियंत्रण आणण्यासाठी रविवार, सोमवार, मंगळवार असे तीन दिवस लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

तहसीलदार महेंद्र माळी म्हणाले, श्रीगोंदे शहर, तालुका तीन दिवस पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामधून मेडिकल, रुग्णालये त्याचबरोबर इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24