पोलीस बंदोबस्त असून यात्रेत गोंधळ, तलवारी घेऊन माजवली दहशत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर :- तालुक्यातील टाकळीभान येथील ग्रामदैवत श्री महादेव यांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत झाला;

मात्र यात्रेत पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही मोठ्या प्रमाणावर भुरट्या चो‍ऱ्या झाल्या,

तसेच खुलेआम तलवारी घेऊन दहशत निर्माण करण्याचे प्रकार झाल्याने भाविक व ग्रामस्थांमधून पोलिसांविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.

सोरट, चिवचिव याची एक सामाजिक कार्यकर्ता पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यासाठी मोबाइलमध्ये व्हिडिओ शुटिंग करत होता. त्यावेळी एका पोलिसाने त्याला मारहाण केली. 

त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलीस संरक्षण जत्रेसाठी की जुगार खेळणाऱ्यांसाठी? असा प्रश्न यावेळी भाविकांनी उपस्थित केला

ग्रामदैवत महादेव यात्रोत्सव सोमवार, दि. १३ व मंगळवार, दि. १४ मे रोजी मोठ्या उत्साहात झाला.
यात्रेत बंदोबस्तासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करूनही काही गुंड प्रवृत्तीचे लोक तलवार घेऊन जत्रेतून दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होते.

चोरट्यांनी लहान मुलांच्या गळ्यातील, महिलांच्या गळ्यातील, कानातील दागिन्यांची चोरी केली. 
तसेच अनेकांच्या खिशातील पाकिटे, मोबाइल चोरीस गेले आहेत. यात्रेत चोरट्यांचा एवढा प्रकार होऊनही तक्रार मात्र करण्यात आली नाही.

यात्रेत बंदोबस्तासाठी मोठा पोलीस फौजफाटा असूनही चोर खुलेआम यात्रेत फिरून हातसफाई करीत होते. तरीही पोलिसांना याचा थांगपत्ता लागला नाही.

तक्रार देऊनही चोरीचा तपास लागत नाही, त्यामुळे तक्रार देऊन काय उपयोग होणार, अशी चर्चा ग्रामस्थांमधून सुरू होती.

अहमदनगर लाईव्ह 24