श्रीरामपूर :- शहरालगत असलेल्या दत्तनगर भागातील आंबेडकर वसाहत येथे राहणारे विवाहित तरुणी आरजू सलमान पठाण, वय २६ हिला तिचा पती सलमान मुख्तार पठाण, वय २७ याने पत्नी आरजू हिच्यावर शंका घेवून २ वर्षाचा मुलगा अफान हा माझा मुलगा नाही, असे म्हणत पत्नी आरजू व मुलगा अफान यांना मारहाण केली.
यात मुलगा अफान सलमान पठाण हाही जखमी झाला असून काल याप्रकरणी आरजू सलमान पठाण या महिलेने वरीलप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी नवरा सलमान मुख्तार पठाण, रा. दत्तनगर, आंबेडकर वसाहत श्रीरामपूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.