आईला मुलगा व सुनेकडून मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर – जन्मदात्या आईलाच मुलगा व सुनेकडून मारहाण झाल्याची संतापजनक घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे.

तालुक्यातील भामाठाण येथे राहणारी वृद्ध महिला सुंदराबाई जयराम तांदळे, वय ६५ यांना आरोपी बाळासाहेब जयराम तांदळे

याने घरगुती कारणातून बेदम मारहाण करुन डोके फोडले तर त्याची पत्नी सौ. निर्मला बाळासाहेब तांदळे हिने विळी फेकून मारुन जखमी केले.

मुलगा व सुनेने सुंदराबाई तांदळे यांना शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
जखमी सुंदराबाई जयराम तांदळे यांनी वरीलप्रमाणे फिर्याद दिल्याने

आरोपी बाळासाहेब जयराम तांदळे, सौ. निर्मला बाळासाहेब तांदळे, दोघे रा. भामाठाण, ता. श्रीरामपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि खान यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.


अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24