लता मंगेशकर व्हेंटिलेटरवर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई :- श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असलेल्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. 

सोमवारी त्यांना व्हायरल झाल्यामुळे श्वसनाचा त्रास झाला होता, असं सांगण्यात आलं होतं. आणि ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं होतं.

लतादीदींच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स हा संसर्ग कसा रोखता येईल यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. जमेची बाजू म्हणजे दीदी या गायिका असल्याने त्यांची फुफ्फुसे मजबूत आहेत. यामुळेच अजूनही त्या आपल्या आजाराशी लढत आहेत.

लतादीदींच्या तब्येतीबाबतचे वृत्त कळताच त्यांच्या जगभरातील चाहत्यांमध्ये चितेचे वातावरण परसले आहे. जवळजवळ तीन पिढ्या लतादीदींचे गाणे ऐकत वाढल्या आहेत.

९० वर्षीय लतादीदींनी हिंदी, प्रादेशिक तसेच परदेशी भाषांमध्ये ३० हजारहून अधिक गाणी गायिली आहेत. २००१ मध्ये त्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आले होतेे. त्यापूर्वी पद्मविभूषण, पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

अहमदनगर लाईव्ह 24