त्या तरुणाच्या खूनप्रकरणी 24 तासांच्या आत सहा जणांना अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव शिवारात झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी शहर पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, की शनिवारी रात्री साडेसात वाजता नागेश गवळीराम साळवे याचा काही लोकांनी गावठी कट्ट्यातून गोळी घालून खून केला होता.

रविवारी याप्रकरणी मयताचा भाऊ हौशिराम साळवे यांनी फिर्याद दिली. तीत म्हटले आहे, की बहिण मंगल हिने राहाण्यासाठी घेतलेल्या जागेच्या वादावरून राजू वायकर याने भाऊ मंगेश याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला व राजू गांगुर्डे याने पिस्तुलातून भाऊ नागेश याच्या छातीत गोळी घातली व त्याचा खून केला.

इतर आरोपींनी फिर्यादी व घरातील व्यक्तींना मारहाण केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ९५०/२०२० नुसार भा.दं.वि. कलम ३०२, ३२६, ३२४ सह इतर कलमे व आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंदविला आहे.

गुन्हा घडल्यानंतर शहर पोलिसांनी २४ तासांच्या आत राजेंद्र बाबासाहेब गांगुर्डे, पार्वतीबाई बाबासाहेब गांगुर्डे, सविता गांगुर्डे, बाबासाहेब गांगुर्डे, सुखदेव इंगळे धोंडीराम ऊर्फ तुकाराम भानुदास इंगळे यांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24