…तर कारवाईसाठी तयार रहा! ‘या’ आमदारांचा मनपा अधिकारी ठेकेदारांना इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- शहरामध्ये फेज २ व अमृत भुयारी गटार योजनेच्या कामामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तसेच काही रस्त्यांच्या पॅचिंगच्या कामास सुरुवात झाली आहे.

या रस्त्याच्या रुंदीकरण भागात डांबरीकरण करण्यात येणार आहे. विविध विकास कामातून शहराचे रुप बदलायचे आहे. यासाठी अधिकारी, ठेकेदार यांनी कामाच्या दर्जेकडे लक्ष द्यावे.

याचबरोबर कामांमध्ये दिरंगाई टाळून गती द्यावी व लवकरात लवकर पूर्ण करावे. कामांमध्ये कोणी कामचुकारपणा करेल त्याने कारवाईसाठी तयार रहावे असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे.

एका रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ तसेच बागरोजा हाडको ते बालिकाश्रम रोडची पाहणी आ.जगताप यांनी केली. यावेळी ते बोलत होते.

आ.जगताप पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे कामे मंजूर असून या कामांना गती द्यावी. नगर शहर आता आपल्या सर्वांना मिळून विकासकामातून बदलायचे आहे. विकासकामामध्ये सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अहमदनगर लाईव्ह 24