अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- कोरोनामुळे आणखी सात जणांचा गुरुवारी मृत्यू झाला. नवे १७८ पॉझिटिव्ह आढळले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७१ टक्के आहे. १९७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६४ हजार ८५० झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १००८ बळी गेले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ६८, खासगी प्रयोगशाळेत ५३ आणि अँटीजेन चाचणीत ५७ बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील १५, अकोले ६, जामखेड ६, कर्जत ५, कोपरगाव १, नगर ग्रामीण ८, नेवासे १, पारनेर ६, पाथर्डी ५, राहाता ४, संगमनेर ३, शेवगाव ३, श्रीगोंदे १, कॅन्टोन्मेंट १, मिलिटरी हॉस्पिटल १ आणि इतर जिल्ह्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत मनपा १२, अकोले ४, जामखेड १, कर्जत ३, कोपरगाव ३, नगर ग्रामीण २,
नेवासे २, पारनेर २, पाथर्डी २, राहाता २, राहुरी ५, संगमनेर १२, श्रीरामपूर ३ रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत मनपा १४, जामखेड २, कर्जत ६, कोपरगाव १, नगर ग्रामीण २, पाथर्डी ५, राहाता ८, संगमनेर १३, शेवगाव २, श्रीगोंदे ४ रुग्णांचा समावेश आहे.