अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-शुक्रवारी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी 21 उमेदवारांचे 68 अर्ज दाखल झाले असून बँकेच्या संचालक मंडळासाठी आतापर्यंत 106 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. तर 644 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज विकत नेलेले आहेत.
दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार शेवट दिवस असल्याने उमेदवारांची मोठी गर्दी होणार आहे. दरम्यान शुक्रवारी दाखल अर्जामध्ये पाथर्डीच्या आ. मोनिकाताई राजळे,
पारनेरचे आ. नीलेश लंके, राहुरीचे माजी आ. शिवाजीराव कर्डिले, श्रीरामपूरचे ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे, शेवगाव-पाथर्डीचे माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील,
राहत्याचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब म्हस्के, श्रीगोंदा साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, नेवासाचे माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह काही विद्यमान संचालक यांचा समावेश आहे.
शुक्रवारी बँकेच्या संचालक पदासाठी 184 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज विकत नेले असून यामुळे आतापर्यंत 644 अर्जाची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दिली. तर आतापर्यंत 106 अर्ज दाखल झाले असून शुक्रवारी त्यातील 68 अर्जाचा समावेश आहे.