कोरोनामुळे झाला जिल्ह्यातील इतक्या रुग्नांचा मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात दिवसभरात ३१६ रुग्ण आढळले. तिघांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९७१ झाली आहे. जिल्ह्यात बऱ्याच दिवसांनंतर बुधवारी ३०० हून अधिक रुग्ण आढळले.

उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५५७ झाली आहे. २४ तासांत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९७, खासगी प्रयोगशाळेत ११० आणि अँटीजेन चाचणीत १०९ बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये मनपा हद्दीतील २४, अकोले २, जामखेड ४, कोपरगाव २५, नगर ग्रामीण ५, नेवासे ६, पारनेर २, पाथर्डी १०, राहुरी २, संगमनेर ५, शेवगाव ४, श्रीगोंदे ५, कॅन्टोन्मेंट ३ रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत मनपा ३९, अकोले २, कर्जत २, कोपरगाव २, नगर ग्रामीण ९, नेवासे ४, पारनेर ७, पाथर्डी २, राहाता ११, राहुरी ६, संगमनेर १७, शेवगाव १, श्रीगोंदे १ आणि श्रीरामपूर ७ रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत मनपा १०, अकोले ५, कर्जत ५, कोपरगाव ५, नगर ग्रामीण ६, नेवासे ५, पारनेर ५, पाथर्डी १४, राहाता १२, राहुरी २, संगमनेर २१ रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर लाईव्ह 24