अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : 3 जूनला जिल्ह्यातील निगर्स चक्रीवादळामुळे राहाता, शेवगाव जामखेड आणि कर्जत तालुका वगळता उर्वरित 10 तालुक्यात नुकसान झाले आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना सरकारच्या नियमानूसार पिकनिहाय मदतीची रक्कम मिळणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळमुळे झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील 1549.46 हेक्टर शेतीपिकाचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील अहवाल काल जाहीर केला.
शेतपिकाचे नुकसान झालेल्या मध्ये अकोले 82.30 हेक्टर,, संगमनेर 1070.37, राहुरी 45.99, नगर 2.38, कोपरगाव- 1.70 हेक्टर, नेवासा 4.84, पारनेर 292.30, पाथर्डी 12.50, श्रीगोंदा 7.40 आणि श्रीरामपूर 29.68 हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाले.
याशिवाय, नगर आणि संगमनेर तालुक्यात प्रत्येकी एक आणि शेवगावमध्ये दोन व्यक्ती जखमी झाल्याच्या घटना घडल्या तर अकोले तालुक्यात एका युवकाचा मृत्यू झाला.
याशिवाय, काही ठिकाणी जनावरे दगावण्याच्या घटनाही घडल्या. यांत अकोले 4, संगमनेर 7, कोपरगाव 1, श्रीरामपूर 2, नेवासा 1, राहाता 6, पारनेर 5, अशी 26 जनावरे मृत्युमुखी पडली.
जिल्ह्यातील 32 कच्च्या प्रकारच्या घरांचे नुकसान झाले. यात, संगमनेरमध्ये सर्वाधीक 10 घरांचे नुकसान झाले. तसेच, अकोले 1, कर्जत 1, कोपरगाव 10, नेवासा 2 आणि राहुरी 8 असे कच्च्या घरांचे नुकसान झाले.
तर अंशतः कच्ची असलेल्या 749 घरांचे नुकसान झालेले आहे. यांत नगर 8, अकोले 61, कर्जत 3, कोपरगाव 21, नेवासा-8, पारनेर 44, पाथर्डी 10, राहुरी 17, संगमनेर 531, श्रीगोंदा 13, श्रीरामपूर 18 आणि राहाता 15 असे नुकसान झाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews