कोरोनाच्या बिलात ‘इतकी’ अतिरिक्त रक्कम ; प्रशासनाकडून हॉस्पिटलला नोटीसा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

परंतु अनेक खासगी हॉस्पिटलकडून मात्र या रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यावर अंकुश ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली. या समितीने अद्यापपर्यंत 80 बिलांची तपासणी पूर्ण केली आहे.

यात सुमारे 8 हॉस्पिटलकडून 8 लाख 63 हजार रुपयांची रक्कम जादा आकारण्यात आली असून ती वसुलीस पात्र असल्याचे नोंदविण्यात आले आहे.

शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त आकारणी करणार्‍या 8 हॉस्पिटलला प्रशासनाने नोटीस पाठवित खुलासा मागविला आहे. समितीने या हॉस्पिटल प्रशासनाला नोटीस धाडली आहे.

जास्त बिलाच्या आकारणीबाबत त्यांचे म्हणणे समितीसमोर आल्यानंतर अंतिम अहवाल तयार होईल. त्यानंतर तो कलेक्टरांकडे जाईल.

कोणत्या हॉस्पिटलकडून किती रक्कम वसुल करायची याचा अंतिम निर्णय कलेक्टर राहुल द्विवेदी हे घेतील अशी माहिती समितीच्या अध्यक्षा पल्लवी निर्मळ यांनी दिली.

जादा बिल आकारणी करणारे हॉस्पिटल हे सावेडी भागातील आहेत. एका हॉस्पिटलने तर पीपीई किट, जेवण खर्च, ऑक्सिजन चार्जेस, मॉनिटर चार्जेस, सहाय्यक डॉक्टर चार्जेस,

पॅथॉलाजी चार्जेस लावल्याचे तपासणी केलेल्या बिलांतून समोर आले आहे. 1 हजार 691 रुग्णांनी खासगी हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्यातील 1 हजार 245 बाधित रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.

काही रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. तपासणी समितीने 30 हॉस्पिटलमध्ये पथके नियुक्त करत त्यांच्यामार्फत तपासणी सुरू केली आहे.

30 मधील सुमारे 7 हॉस्पिटलमध्ये एकाही रुग्णांवर उपचार झालेले नाहीत. तीन हॉस्पिटलमध्ये बिल ही एक लाखाच्या आतील आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24