अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : कोरोना संकट जाईपर्यत रेड झोन तसेच बाहेरगावातून आलेल्या नातेवाईकाना राजकीय पुढाऱ्यानी घरात आश्रय दिला तर पाच वर्ष निवडणुक लढवून देणार नाही.
तसेच आधार देणाऱ्या नागरिकाना सहा महिने ग्रामपंचायतीच्या सर्व सुविधा पासून वंचित रहावे लागेल असा निर्णय हिंगणगाव ग्रामपंचायत व ग्राम सुरक्षा समितीने घेतला आहे अशी माहिती ग्रामविकास अधिकारी जाधव सरपंच आबासाहेब सोनवणे यांनी दिली.
नगर जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सुरक्षतेच्या दुष्टीने हा निर्णय घेतला , या बाबत ठरावही घेण्यात आला. नगर तालुक्यात रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
रात्री आपरात्री नागरिक घरी येतात क्वारंटाईन न होता नातेवाईकांच्या घरी राहतात. नगर तालुक्यात चार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत . हे सर्व रेड झोन मधून आलेले आहे.
तालुक्यात मुंबई पुणे येथून येणाऱ्या नागरिकाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रात्री अपरात्री नागरिक गावात येतात . आरोग्य विभाग , ग्रामसुरक्षा समितीला आल्याची माहीत होउ नये यासाठी घरात लपून बसत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews