..तर 10 वी व 12 वीचे निकालही लांबण्याची शक्यता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याकरिता निर्धारित स्थळी पोहोचविण्यासाठी लॉक डाऊन मध्ये सूट मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी व मार्च 2020 मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका संबंधित शिक्षकांकडे तसेच शिक्षण मंडळ कार्यालयात अडकून पडल्या आहेत.

या उत्तर पत्रिका तपासण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पोहोचणे आवश्यक असून, या तपासणीनंतरच परिक्षेचा निकाल लावता येणार आहे. लॉक डाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका अडकून पडल्याने परीक्षेचा निकाल घोषित करण्याबाबतची प्रक्रिया थांबली आहे.

परिणामी पालक व विद्यार्थी चिंतातूर अवस्थेत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केलेली विनंती मान्य करून परीक्षेच्या उत्तरपत्रिका ने आण करण्यासाठी लॉक डाऊन काळात सुट देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे.

इयत्ता दहावी व बारावी बोर्डाची परिक्षा विद्यार्थांच्या भविष्याचा टर्निंग पाँईट असून, या निकालावर त्यांच्य भविष्याचा प्रश्‍न देखील अवलंबून आहे. सदरील उत्तरपत्रिका तपासणीसाठी निर्धारित स्थळी पोहोचविण्यासाठी सूट न दिल्यास त्यांचा निकाल देखील लांबण्याची शक्यता निर्माण होणार आहे.

सदर मागणीसाठी जिल्ह्यातील शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, चंद्रकांत चौगुले, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे,

सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा. श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण,

इकबाल सर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, देवकर सर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, उकीर्डे सर, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, थोरे सर, प्रदीप बोरूडे आदि प्रयत्नशील आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24