अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ खासदारांचे सोशल डिस्टन्सिंग मतदारसंघाला घातक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-शिर्डी मतदारसंघात करोना साथीच्या उद्रेकाने नागरिक व प्रशासन हैराण झाले असताना खासदार सदाशिव लोखंडे यांचे सोशल डिस्टन्सिंग मतदारसंघासाठी घातक असल्याची टीका लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ॲड. नितीन पोळ यांनी केली आहे.

पत्रकात पोळ यांनी म्हटले, की की मागील लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघाचे खासदार दाखवा व बक्षीस मिळवा अशा स्वरूपाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या; मात्र तरीदेखील कोपरगाव तालुक्यातील जनतेने शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांना भरभरून मतदान करून निवडून दिले;

मात्र निवडून गेल्यावर पुन्हा एकदा ये रे माझ्या माघल्या. या म्हणीप्रमाणे खासदार गायब झाले. ते मतदारसंघात फिरकत नाही म्हणून कोणाचे काही अडलेदेखील नाही; मात्र एक वर्षांपासून सुरू असलेल्या करोना साथीच्या आजाराने संपूर्ण तालुक्यात नागरिक हैराण झाले आहे.

सध्या तर साथीच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले असून कोविड सेंटर सुरू करणे, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी दिवसेंदिवस प्रशासनावर दबाव वाढत आहे; मात्र शासनाने सुरक्षित अंतर, मास्क वापरा अशा सूचना केल्या असून खासदार या सूचनांचा पुरेपूर वापर करत असून

तालुक्याची परिस्थिती गंभीर असताना व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी कोपरगाव तालुक्यातील मतदार गंभीर परिस्थितीला सामोरे जात असताना मूग गिळून बसलेले आहेत. खासदार लोखंडे यांनी पाळलेली सोशल डिस्टन्सिंग घातक आहे.

खासदार निवडून जाण्यासाठीच मतदारसंघात येणार असतील, तर त्यांच्यासाठी दार कायमचे बंद केल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, अशा इशारादेखील या पत्रकात दिला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24