महिलेचे फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवून त्यांनी केले असे काही कि झाली जेलमध्ये रवानगी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :  संगमनेर मध्ये एका महिलेच्या नावाने  इंस्टाग्राम या फोटो शेअरिंग वेबसाईट वर फेक अकाऊंट तयार करून तिची बदनामी करणाऱ्या दोघांना नगर सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

संकेत नानासाहेब गाडेकर (रा. राजापूर ता. संगमनेर), तेजस कैलास ससकर (रा. गोल्डन सिटी, संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

या प्रकरणी जानेवारीमध्ये बदनामी झालेल्या महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. काही दिवसांपूर्वी फिर्यादी महिलेच्या नावाने अज्ञात व्यक्तीने इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केले होते.

या अकाउंटवर संबंधित महिलेचे फोटो अपलोड करून तिच्या ओळखीच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आल्या होत्या. काही मित्रांसोबत चॅटिंग करून या महिलेची बदनामी केली गेली.

तसेच फिर्यादी महिलेच्या व्हाट्सअप मोबाईल क्रमांकावर अज्ञात इसम वेळोवेळी मेसेज पाठवून शिवीगाळ करत होता. फोन करून मानसिक त्रासही देत होता.

याबाबत संबंधीत महिलेने 30 जानेवारीला नगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंदविला होता.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता संगमनेर तालुक्यातील संकेत गाडेकर व तेजस ससकर यांनी हा गुन्हा केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी या दोघांना मंगळवारी अटक केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24