अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याने केला तरुणावर हल्ला, बिबट्याशी झुंज आणि अखेर झाले असे काही….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अकोले: अकोले तालुक्यातील प्रवरा परिसरातील चितळवेढे येथे बिबट्याने तरुणावर हल्ला केला. तरुणाने बिबट्याचा तेवढ्याच ताकदीने प्रतिकार केला. काही काळ दोघांची झुंज चालल्यानंतर अखेर बिबट्या पसार झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अकोले तालुक्यातील चितळवेढे येथे समीर अशोक आरोटे (वय २१) हा आपल्या शेतामध्ये टोमॅटोला पाणी भरत असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला.

मात्र समीर आरोटे यांनी देखील बिबट्याबरोबर तेवढ्याच ताकदीने प्रतिकार केला. त्यांनी बिबट्याला नमोहरम केल्याने काही क्षणात बिबट्याने तिथून पळ काढला. या तरुणाच्या अंगावर बिबट्याने नखे ओरखडली आहेत.

राजूर वन विभागाला याबाबत संपर्क साधला असता या तरुणावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून दुसऱ्या दिवशी नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात येणार आहे.

तसेच वन वभागाकडून त्यांना सर्वोतपरी मदत केली जाईल, असे आश्वासन राजुर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप जाधव यांनी दिले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24