अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- गेल्या आठवड्यात नेवासे तालुक्यातील सोनई व घोडेगावमध्ये करोना रुग्ण संख्या अत्यल्प दिसून आली.
परंतु सोमवार 24 रोजी प्राप्त झालेल्या अहवालात अहमदनगर येथे खासगी लॅबमध्ये गेल्या तीन दिवसांत तपासणी केलेल्या 11 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत,तर घोडेगाव येथे 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की सोनई येथे सुरुवातीच्या काळात करोना बाधित सापडले. 24 जुलैपर्यंत शासनाने लॉकडाऊन जाहीर केलेले होते.त्या काळात रुग्ण संख्या मर्यादित राहिली परंतु 25 जुलैला अनलॉक झाल्याने सर्व आस्थापना दुकाने खुलेआम सुरू झाली
ईद, बैलपोळा व गणपती उत्सव कारणाने बाजारपेठेत मोठी गर्दी वाढली सामाजिक अंतर ठेवण्यात आलेले नसल्याने तसेच सॅनिटायझर मास्कचा वापर, तपासण्या होत नसल्याने गर्दी वाढतच गेली.
आजूबाजूचे खेडीपाडी गावागावांतून लोक कापड, किराणा, भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होऊ लागली परंतु तालुका प्रशासन व स्थानिक प्रशासनाने या गर्दीबाबत काहीही ठोस भूमिका घेतली नाही
आणि करोनाने पुन्हा एकदा सोनईला ‘विळखा’ घातलेला असल्याचे सोमवारी प्राप्त झालेल्या आरोग्य विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved