नवी दिल्ली :- मध्य प्रदेशात काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षात जाेरदार वादाला सुरुवात झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदावरून सुरू असलेला वाद सुटावा यासाठी काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि दुसरे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना दिल्लीला बोलावले आहे.
विशेष म्हणजे हा वाद चिघळू नये म्हणून सोनिया गांधी यांनी या दोन्ही नेत्यांना वेगवेगळे बोलावले आहे. सोनिया गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना मंगळवारी चर्चेसाठी बोलावले आहे, तर बुधवारी मुख्यमंत्री कमलनाथ यांना बोलावले आहे.
कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थन असलेल्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची सोनिया गांधी यांची इच्छा आहे. मात्र, असा नेता शोधणे सध्या तरी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना कठीण झाले आहे.