‘त्या’ आरोपींच्या शोधार्थ जळगावच्या दिशेने पथके रवाना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाट्याजवळ काल दि. २० रोजी नाशिक जिल्ह्यातून आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी आदिवासी समाजातील चार युवकांची धारदार शस्त्राने भोकसून हत्या केली असल्याची माहिती पुढे आली असून .

काही महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याने हे हत्याकांड स्वस्तात सोन्याच्या आमिषातून करण्यात आले असल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे येत आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाट्याजवळ स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने चार जणांचा चाकूचे वार करून निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला.

यातील आरोपी फरार झालेले असले तरी घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस अधीक्षक यांनी जळगाव आणि नाशिकच्या दिशेने तपासकामी पथके रवाना केल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.

दरम्यान पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंग यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये तळ ठोकला असल्याने तपासाला वेग आला असल्याने लवकरच आरोपी गजाआड होतील अशी अशा व्यक्त होत आहे.

Fb Page Link – https://bit.ly/32d265P

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24