स्थायी समिती सभापती : शिवसेनेतील गटबाजी,राष्ट्रवादीची संभ्रमाची परिस्थिती,भाजपाची ‘ही’नीती पथ्यावर पाडण्याची व्यूहनिती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण सर्वश्रुत आहे. याठिकाणी कधी कोण काय करेल हे सांगता येत नाही असे अनेकांचे मत आहे.

आता महानगरपालिकाच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना चित्र काही अद्याप वेगळेच दिसत आहे.

आ. अनिलभैया राठोड यांच्या निधनांनंतर शिवसेनेत गट पडलेले समोर आले. ही पक्षांतर्गत बंडाळी थांबण्याचे नाव घेत नाही. राष्ट्रवादीचं अजून काहीच फिक्स ठरलेले नाही.

हे सर्व वातावरण भाजप आपल्या पत्त्यावर घेण्याच्या विचारात आहे. भाजपकडून मनोज कोतकर यांचे नाव सभापतीपदासाठी निश्चित झाले असून त्यांनी ‘सोधा’चा आधार घेतल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

विद्यमान सभापती मुदस्सर शेख यांचा कार्यकाळ संपला असल्याने नव्या सभापती पदाची निवडणूक जाहीर झाल्याने हे पद मिळावे यासाठी भाजप कामाला लागली आहे.

सोळा सदस्य असलेल्या समितीत भाजपचे चार सदस्य असले तरी केडगावचे नगरसेवक कोतकर यांना उमेदवारी देत ‘सोधा’च्या आशेवर भाजप गणित जुळवू पाहत आहे.

शिवसेनेकडून केडगावचे नगरसेवक विजय पठारे व श्याम नळकांडे हे स्थायी समिती सभापती पदासाठी इच्छुक होते. आता सुभाष लोंढे यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे.

भाजपकडून मात्र मनोज कोतकर यांचे एकमेव नाव असल्याचे समजते. राष्ट्रवादी उमेदवार कोण? याचा निर्णय अजून झालेले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24