तीन तोळ्यांचे गंठण लांबवले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण दुचाकीवरील चोरट्याने हिसकावून नेले. नगर-कल्याण रस्त्यावरील माधवनगर बोर्डाजवळ ही घटना घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कविता सुनील बाचकर (वय ३२, रा. माधवनगर, नगर-कल्याण रोड) या नगर-कल्याण रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून एकजण आला.

त्याने बाचकर यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून घेतले. त्यानंतर दुचाकीचा वेग वाढून तो पसार झाला. बाचकर यांनी आरडाओरड केली.

परंतु कोणी मदतीला येण्यापूर्वीच चोरटा पसार झाला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सविता बाचकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे हे करीत आहेत.

अभिनेत्री केतकी माटेगावकर बद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत ?

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24