अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- एसटीचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. कारण कुठल्याही हॉटेलच्या थांब्यावर बस 15 मिनिटांहून अधिक वेळ थांबली तर तिच्या चालक वाहकांची चौकशी करून त्यांना कारवाईला सामोर जाव लागणार आहे.
काही चालक-वाहक प्रवाशांना जेवणासह इतर सुविधांचा लाभ घेता यावा म्हणून जास्त वेळ बस थांबवून ठेवतात. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक विभाग नियंत्रकाला चालक-वाहकांना स्पष्ट सूचना देण्यास सांगण्यात आलं आहे.
एसटीच्या सर्व विभाग नियंत्रकांकडे यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. एसटी बसेससाठी लांबच्या प्रवासादरम्यान विविध थांबे निश्चित करण्यात आलेत.त्यासंदर्भातील सूचना एस टी महामंडळाने दिल्या आहेत.
मार्ग तपासणीपथक आणि पर्यवेक्षकांना वेळोवेळी पाहणी करावी लागणार आहे. एखादी बस जरा 15 मिनीटांपेक्षा जास्त वेळ थांबली तर तिच्या चालक वाहकांवर चौकशीचा बडगा उगारला जाईल.