अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील सद्गुरू कृषी महाविद्यालयातील विद्याथ्र्याने बसस्थानकासमोरील राहत्या खोलीत पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
महंमद बशीथ जहांगीर (वय २२), रा. झाप्ती सद्रोदे, उप्पूनूनथला, जि. मेहबूबनगर, तेलंगणा, असे मयत विद्याथ्र्याचे नाव असून, तो तृतीय वर्षात शिकत होता.
याबाबत अभिषेक नारायण जहांगिररवार (वय४०), रा. चौकटे कॉलनी, मिरजगाव, यांच्या खबरीवरून मिरजगाव पोलिस दूरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अभिषेक जहांगिरवार यांनी पोलिसांना दिलेल्या खबरीनुसार- त्यांच्या मालकीच्या मिरजगाव येथील बसस्थानकासमोरील दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये मयत महंमद आणि राजू रेड्डी, असे दोघेजण राहात होते.
आज दुपारी बारा वा. जहांगिरवार हे आपल्या पत्नीला उपचारासाठी खासगी दवाखान्यात घेऊन गेले असता, त्यांना राजू रेड्डी यांनी फोन करून महंमदने पंख्याला बेडशीट बांधून आत्महत्या केली असल्याचे सांगितले.
या महाविद्यालयीन विद्याथ्र्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मिरजगाव परिसरात खळबळ उडाली आहे. या विद्याथ्र्याने आत्महत्या का केली, याबाबतचे कारण समजले नाही.