अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हिंदीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवली नाही, या कारणावरून कोपरगाव तालुक्यातील एस. जी. विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्याला अन्य आठ विद्यार्थ्यांनी चॉपर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. सकाळी ८ वाजता हिंदीचा पेपर होता.
उत्तरपत्रिका दाखवली नाही, म्हणून संबंधित विद्यार्थ्याला पेपर सुटल्यानंतर शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
तो गंभीर जखमी झाला असून त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून ते फरार आहेत.