पंचायत समिती पाथर्डीच्या सभापतिपदी सुभाष केकाण?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पाथर्डी : पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटासाठी निघाले. एकूण दहा सदस्य असलेल्या सभागृहात आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे स्पष्ट बहुमत आहे.

त्या ठरवतील तोच सभापती होईल. नागरिकांचा मागास प्रवर्ग गटात अकोला गणाचे सदस्य सुभाष केकाण एकमेव आहेत. पंचायत समिती गणावर या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभुत्व होते.

राजळेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत त्यांचे कट्टर समर्थक केकण यांनी विजय संपादन केला. उपक्रमशील व पक्षासाठी धावपळ करणारे म्हणून केकाण यांच्याकडे पाहिले जाते.

अंतिम निर्णय राजळे यांचा असला, तरी विद्यमान सभापती चंद्रकला खेडकर, सुनीता दौंड यांच्या समर्थकांनी मोर्चेबांधणी चालवली आहे. आरक्षण निघाले त्याच प्रवर्गाला संधी मिळावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी राजळेंकडे धरला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24