श्रीगोंदे : श्रीगोंदे तालुक्यातील पिसोरे बुद्रुक येळपणे येथे गुरुवारी सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बकुळाबाई तान्हाजी गिरे यांच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. दरम्यान, नगर, कर्जत, श्रीगोंदे, जामखेडमध्ये अवकाळी पाऊस झाला.
अवकाळी पावसाने जनावरांच्या छावण्यांतील शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. दरम्यान, कर्जत तालुक्यातील करमनवाडी येथे मेंढपाळ संभाजी शंकर पाटोळे याचा वीज पडून मृत्यू झाला.
श्रीगोंदे तालुक्याच्या पश्चिम भागातील येळपणे येथील पिसोरे बुद्रुकमधील बकुळाबाई तान्हाजी गिरे या शेळ्या चरण्यासाठी वीर मळ्यात गेल्या होत्या.
पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आभाळ दाटून आले. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्यामुळे बकुळाबाई झाडाच्या आडोशाला थांबल्या. पण त्याच क्षणी त्याच झाडावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.