तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर | संगमनेर खुर्द येथे सिद्धकला आयुर्वेदिक महाविद्यालयात जवळे-बाळेश्वर येथील शंकर विठ्ठल पांडे (८०) या वृद्धाने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.

पांडे हे सांधेवाताच्या उपचारासाठी मंगळवारी महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल झाले होते. ही घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजता घडली. संगमनेर शहर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

महाविद्यालयाचे प्रमुख विश्वस्त डॉ. नैमेष सराफ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बिल्डिंगला सुरक्षा कंपाउंड असताना नैसर्गिकरित्या पडणे हे शक्य नाही, मात्र तेथे असलेल्या खिडकीतून त्यांनी उडी घेतली असावी. परंतु बुधवारी ही घटना घडली त्यावेळी बरोबर कोणी नव्हते. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही,

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24