इंदौर : मध्य प्रदेशच्या इंदौर शासकीय रुग्णालयात एका हत्या ेप्रकरणातील विचाराधीन कैद्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. शरीरावरील जखमांवर बांधलेली पट्टी काढून त्या पट्टीच्या मदतीने या कैद्याने गळफास घेतल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.
रामकृष्ण कतिया (३५) नावाच्या कैद्याविरोधात हदरा येथील स्थानिक न्यायालयात हत्येचा खटला सुरू होता. न्यायालयाने कोठडी ठोठावल्यामुळे त्याला जिल्हा कार्यालयात ठेवण्यात आले होते.
या कैद्याचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर १७ ऑक्टोबर रोजी त्याला उपचारासाठी इंदौर येथील महाराज यशवंतराव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या दरम्यान शनिवारी रात्री २ वाजेच्या सुमारास कतियाने जखमांवर बांधलेल्या पट्ट्या काढल्या व या पट्ट्यांच्या मदतीने रुग्णालयातील शौचालयात गळफास लावून आत्महत्या केली.