तरुणाची दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर: तालुक्यातील कनोली येथील किरण रंभाजी वर्पे (वय २५) या तरुणाने आपल्या राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. आश्वी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कनोली येथील किरण वर्पे या तरुणाने सकाळी नेहमीप्रमाणे जनावरांना चारापाणी केला होता. यावेळी घरात कोणीही नसल्याचे पाहून त्याने आपल्या राहत्या घरात सकाळी ९ वाजेच्या सुमारास गळफास घेतला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील नानासाहेब वर्पे यांनी घटनास्थळी दाखल होत आश्वीचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना फोनवरुन माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करुन पंचनामा केला.

यानतंर या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील रुग्णालयात पाठवण्यात आला होता. दुपारी उशीरा किरण यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. दरम्यान यावेळी मयत किरण वर्पे यांच्याकडे एक कागद सापडला असून यावर ‘आई, बाबा मला माफ करा’ असे लिहिलेले असल्याची माहिती तपास करणारे हवालदार एकनाथ बर्वे यांनी दिली.

मयत किरण यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, चुलता, चुलती असा मोठा परिवार असून त्याच्या अकाली निधनाने कनोली पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अभिनेत्री केतकी माटेगावकर बद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत ?

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24