महानगर पालिका कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर : महापालिकेच्या आरोग्य विभागात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या नामदेव दत्तात्रय गाढवे (वय ५६, रा. सबजेल चौक, नगर) याने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

काल सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. गाढवे यांनी नेमकी कशामुळे आत्महत्या केली, हे समजू शकले नाही. ड्युटी संपल्यानंतर गाढवे यांनी सबजेल चौकातील घरी दोरीने गळफास घेतला.

काही वेळातच हा प्रकार लक्षात आल्यानंतर बेशुद्धावस्थेतील गाडगे यांना उपचारासाठी आनंदऋषी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी गाढवे हे मयत झाल्याचे सांगितले.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24