उपचारांसाठी पैसे नसल्याने आजारपणाला कंटाळून आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :-  राहुरी तालुक्यातील कणगर येथील रावसाहेब बर्डे (४२ वर्षे) यांनी आजारपणाला कंटाळून गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास आत्महत्या केली.

हलाखीच्या परिस्थितीमुळे उपचारांसाठी पैसे खर्च करणे त्यांना शक्य नव्हते. गळा चिरलेल्या अवस्थेत ते दिसताच तातडीने नगर येथील जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले.

तथापि, त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक निरीक्षक यशवंत राक्षे, हवालदार दिनेश आव्हाड, काॅन्स्टेबल पथवे यांनी घटनास्थळी भेट दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये


https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24