राहुरी : राहुरीच्या कृषी विद्यापिठात ठेकेदार मार्फत नोकरीस असलेल्या २३ वर्षिय युवकाचा मुळा नदीपात्रात आज शनिवार दि . २२ फेब्रुवारी रोजी सकाळी मृतदेह आढळुन आला असल्याने मोठी खळबळ उडाली असुन या घटनेमुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे.
याबाबत राहुरी पोलिसात सुरवातीस मिसिंग दाखल करण्यात आली होती तर आज आकस्मात मृत्यु ची नोंद करण्यात आली आहे. दि . २२ रोजी गणेश डाडर या युवकाचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना मासेमारी करणाऱ्यांना दिसुन आला. गणेश हा तीन दिवसापूर्वी विद्यापिठात कामाला जातो असे सांगून गेला होता.
तो आला नसल्याने गणेशचे वडिल नाना डाडर , वय वर्ष ४९ यांनी राहुरी पोलिसात मिसिंगची खबर दिली होती. तोच आज मुळा नदीपात्रात गणेशचा मृतदेह मिळून आल्याने पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्या दुचाकीच्या डिकीत एक चिठ्ठी मिळुन आली असल्याची माहिती पोलिस सुत्राकडुन समजली आहे.
यावरुन गणेशने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. गणेशचा विवाह चार महिन्यापूर्वी झाला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. गणेशने आत्महत्या का केली? त्याचे कोणाशी काही वाद झाले होते का? याचे कारण समजू शकले नाही. सदर घटनेने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.