अहमदनगर – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५१६-अ चे रखडलेले चौपदरीकरण व लष्करी आस्थापनेचे भूसंपादन तातडीने पूर्ण करावे, अहमदनगर दक्षिण लोकसभेचे अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेच्या शीतकालीन सत्रात रस्ते विकास मंत्रालय व रक्षा मंत्रालय यांच्या कडे केली.
नगर-करमाळा-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५१६-अ च्या चौपदरीकरणाविषयी मुद्दा खासदार डॉ. सुजय विखे यांनी लोकसभेत उपस्थित करून या प्रश्नाकडे सभागृह लक्ष वेधले.
नगर-सोलापूर रोड हा सुरक्षा विभागाच्या हद्दीत येतो, भारतमाला योजनेअंतर्गत होणाऱ्या या महामार्गाच्या १४३ किमी अंतराच्या विकास कामांसाठी सुरक्षा विभागाच्या हद्दित येणारी १.६० हेक्टर जमीन व शाळा तसेच आर्मड कॉर्प हद्दीत येणारी ३.५ हेक्टर जमीन लवकरात लवकर भूसंपादित करण्याची विनंती सरकारच्या माध्यमातून सुरक्षा विभागाला केली.
अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित असून नागरिकांना यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्वरित भूसंपादन प्रकिया सुरू केल्यास, संरक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जागेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्यास सहकार्य होईल