अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीत माझा होत असलेला विजय मी माझे आजोबा ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांना अर्पण करतो.
नगर आणि शिर्डीतील निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात विखे पाटलांची ताकद दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली.
डॉ. विखे म्हणाले, ‘माझा पराभव करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. राजकारणापलीकडे एकत्र येऊन माझ्या विरोधात एकवटले, मात्र जिल्ह्यातील मतदारांनी सर्वांना उत्तर दिले आहे.
शिर्डीत सदाशिव लोखंडे यांचा तीन दिवसांत प्रचार करून जिल्ह्यात विखे पाटील यांची काय ताकद आहे, ते आम्ही दाखवून दिले. प्रवरा पॅर्टन जिल्ह्यात पुन्हा जिवंत झाला आहे.’