मतदारसंघाबाहेरील सुजय विखेंचे ‘पार्सल’ परत पाठवा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कर्जत : मतदारसंघाबाहेरील डाॅ. सुजय विखेंचे पार्सल परत पाठवा. आरोग्य शिबिराच्या नावाखाली विखे खर्च करत असलेले पैसे जनतेचे व सरकारचे आहेत, त्यांचे स्वतचे नाहीत, असे काँग्रेसच्या बैठकीत सांगण्यात आले. 

डाॅ. विखेंच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर येथील भाग्यतारा मंगल कार्यालयात तालुकाध्यक्ष किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुका काँग्रेसची बैठक झाली.

या वेळी बाळासाहेब साळुंके, प्रवीण घुले, अ‍ॅड. कैलास शेवाळे, बप्पासाहेब धांडे, तात्यासाहेब ढेरे, कृष्णा शेळके, सुरेश खिस्ती, दादासाहेब कानगुडे, शिवदास शेटे, महेंद्र धांडे, हर्षल शेवाळे, बापूसाहेब काळदाते, सतीश पाटील, मिलिंद बागल, नगरसेवक सचिन घुले व ओंकार तोटे, किशोर तापकीर आदी उपस्थित होते. 

बाळासाहेब साळुंके म्हणाले, विखे गेल्यामुळे काँग्रेस एकसंध झाली आहे. काँग्रेसचा पराभव गटबाजीमुळेच झाला. नगर दक्षिणशी डाॅ. विखेंचा काहीही संबंध नाही. बाहेरचे पार्सल माघारी पाठवा.

बारामतीकरांनीही येथे डोकावू नये. त्यांना शिरकाव करू देणार नाही. स्थानिक व्यक्ती कोणीही असो, त्याच्यामागे सर्वांनी उभे रहावे. कोणीही यावे आणि टिकली मारून जावे हे आता बंद करावे. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24