सुजित झावरे पाटील म्हणाले माझ्या सोबत स्पर्धा करा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- सुजित झावरे पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये वेळोवेळी पाठपुरावा करून जिल्हा परिषदेच्या सन 2020 च्या आर्थिक नियोजनात सदर रस्त्याचा समावेश करून या रस्ता कामासाठी निधी मंजूर केला आहे.

सदर रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांचे आभार व्यक्त केले. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे एनएच-222 ते नागबेंदवाडी रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ

जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचे हस्ते संपन्न झाला. नागबेंदवाडी येथील ग्रामस्थांनी काही महिन्यांपूर्वी सदर रस्त्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबतची मागणी केली होती.

यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की, स्व.दादांनी या भागातील विकासाकामांसाठी प्रयत्न केले व मी ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही कोटींची कामे केली आहे.

त्यात भाळवणी पाणी पुरवठा योजना, बंधारे, रस्ते, दलीतवस्ती सुधार योजने अंतर्गत रस्ते, स्ट्रेट लाईट, पेंव्हींग ब्लॉक, वैयक्तीक योजना यामार्फत अनेक भरीव विकासकामे केली आहे.

भाळवणी गावासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहे.

या पुढील काळातही विकासकामांचा वेग असाच सुरू राहिल. तालुक्यात आज ही कोणतीही सत्ता नसताना विकास कामे चालू आहे. माझ्या सोबत विकास कामांमध्ये स्पर्धा करावी, असेेही ते म्हणाले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24