अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- के.के.रेंजच्या प्रश्नावर आम्ही तिघेही आता एकाच व्यासपीठावर आलो आहोत. यापूर्वी जर तिघे एकत्र आलो असतो तर वेगळेच घडले असते !
असे सांगत विखे पाटील, कर्डिले साहेब यांनी साथ दिली असती तर मी आमदार झालो असतो, जणू हीच आपली अधूरी इच्छा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी बोलून दाखवली.
निमित्त होते ते के.के.रेंज संदर्भातील बैठकीचे, या पार्श्वभूमीवर खासदार डॉ.सुजय विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी रविवारी बाधित गावांचा दौरा केला. यावेळी हे तिघेही एकाच व्यासपीठावर विराजमान झाले होते.
माझा पक्ष कोणता आहे हे मला माहीत नाही ? परंतु माझी बांधिलकी जनतेच्या प्रश्नांवर आहे, अशी मार्मिक टिप्पणी करत सुजित झावरे म्हणाले की के.के.रेंजसाठी खासदार विखे यांनी आपली ताकद पणाला लावावी.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved