अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ (नवी दिल्ली) व रयत प्रतीष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सुनिल भिमराव सकट यांना आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते रयतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे झालेल्या पाचव्या लोककला महोत्स वात सकट यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. सुनिल सकट हे लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत.
संघटनेच्या माध्यमातून सकट हे मागासवर्गीय समाजाच्या विकासात्मक कार्यात मागील पंधरा वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक उपोषण, मोर्चे, आंदोलने, चळवळ करुन समाजाचे प्रलंबीत प्रश्न शासन दरबारी मांडून सोडविण्याचे कार्य केले. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती ते समाजापर्यंत पोहचवीत आहे. स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, रक्तदान व वृक्षरोपण आदी विविध सामाजिक उपक्रमात ते अग्रेसर असतात.
महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक गड, किल्ल्यांचे संरक्षण व जिर्णोध्दार करून पर्यटन विकसीत करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु आहे. सकट यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना रयतरत्न पुरस्कार देण्यात आल्याचे संयोजन समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी मेहेरनाथ कलचुरी, राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ.अमोल बागुल, सहाय्यक समाज कल्याण अधिकारी सुर्यमाला पिचड, प्रकल्प अधीकारी संध्या देशमुख, लावणी सम्राज्ञी रोहीणी थोरात, राज्य सरकारचा युवती पुरस्कार प्राप्त जयश्री शिंदे, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, प्रा. सिताराम जाधव, पोपट बनकर, अॅड.महेश शिंदे, अॅड.भानुदास होले, अशोक सोनवणे आदी उपस्थीत होते.
भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त पोपटराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी आनखी वाढली असून, समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी कटीबद्ध राहून कार्य करणार असल्याचे सकट यांनी सांगितले. यापुर्वी देखील सकट यांना सामाजिक कार्याबद्दल जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com