अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- नगरचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांची अवघ्या पाच महिन्यातच शासनाने बदली केली असून त्यांच्या जागी सोलापूर येथील मनोज पाटील यांची नियुक्ती केली होती.
सोलापूर ग्रामीणचे एसपी मनोज पाटील यांची नगरला एसपी म्हणून बदली झाली. पण त्यांच्या जागेवरही नव्या एसपींची नियुक्ती झालेली नाही.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोलापूर मध्ये मराठा आरक्षणाची ज्योत पेटलेली आहे. अशा परिस्थितीत सोलापूरचा चार्ज सोडून नगरला येण्यास विलंब होत असल्याने मनोज पाटील यांची नगर एन्ट्री लांबल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवाय नगरहून बदली झालेले एसपी अखिलेशकुमार यांनाही अद्याप पोस्टींग मिळालेली नाही. मराठा आरक्षणावरून समाजाचे वातावरण तप्त झाले आहे. अशा परिस्थिीत सोलापूरचा चार्ज कोणाकडे द्यायचा असा पेच निर्माण झाला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved