सुवेंद्र गांधींचा ‘यु टर्न’ निवडणुकीतून माघार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर : लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात उमेदवारी करण्याची घोषणा केल्यानंतर खा.दिलीप गांधी यांचे सुपूत्र सुवेंद्र गांधी यांनी आता ‘यु टर्न’ घेतला आहे.

पक्षाचा आणि खा.दिलीप गांधी यांचा आदेश मानून आपण उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला असून, पक्षाच्याच उमेदवाराचे काम करणार असल्याचे सुवेंद्र गांधी यांनी निर्णय घेतला आहे.

खा. दिलीप गांधी यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांचे सुपुत्र सुरेंद्र गांधी यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले होते.

यामुळे सुजय विखे यांना सुरेंद्र गांधीची अडचण होणार अशी चर्चा रंगत असतानाच विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अचानक खा गांधींची भेट घेऊन धक्काच दिला. राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान आले.

दरम्यान  खा गांधी यांनी आपण पक्षाशी एक निष्ठ असल्याचे सांगितले.  पण त्या नंतर सुरेंद्र गांधीनी आपण आपल्या उमेदवारीवर ठाम असल्याचे सांगितले होते.

खा.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी आज (दि.४) सुवेंद्र गांधी यांनी निवडक कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन ही घोषणा केली. यावेळी संघटन सरचिटणीस किशोर बोरा यांच्यासह नगर शहरातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

पक्षाने खा.दिलीप गांधी यांच्यासह सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांचा सन्मान राखला जाईल, असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खा.गांधी यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे आपण उमेदवारी करणार नसून, निवडणुकीत पक्षाच्याच उमेदवाराचे काम सर्वांना करायचे आहे.

अहमदनगर लाईव्ह 24