अहमदनगर : जुन्या भांडणाच्या कारणाहून २० जणांच्या जमावाने कोयता, तलवार, लाकडी, दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दगडफेक केल्यची घटना मंगळवारी (दि.१२) रात्री ९ वा. बालिकाश्रम रोडवर घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, योगेश विठ्ठल जाधव (वय ३१, रा.जाधव मळा, बालिकाश्रम रोड) हे त्यांच्या किराणा स्टोअर्समध्ये बसलेले असताना तेथे सुमेध उर्म टिंग्या साळवे, अक्षय राजेंद्र जाधव, सनी राजेंद्र जाधव, आदिनाथ वनाजी जाधव, वनाजी मारुती जाधव, चित्रा आदिनाथ जाधव, पल्लवी अक्षय जाधव, ध्रुव विजय बोरुडे, कशिष ध्रुव बोरुडे,
प्रणव दाणे, ऋषिकेश दरंदले (रा.पोलीस मुख्यालय), सागर वाढवणे, स्वप्निल सुरेश जाधव, अक्षय गाडे (रा.जाधव मळा) व त्यांच्यासह ४ ते ५ अनोळखी इसम आले व त्यांनी योगेश जाधव, नंदू विठ्ठल जाधव (वय २८), आकाश पांडुरंग जाधव (वय २३), रेणुका प्रशांत चिपाडे (वय २४) यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यासोबत आणलेल्या कोयता, तलवारीने, लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या मारहाणीत नंदू जाधव, आकाश जाधव, रेणुका चिपाडे, भारत जाधव, तुकाराम गायकवाड हे पाच जण जखमी झाले. या नंतर जमावाने परिसरात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने दुकानावर व परिसरात अंधाधुंदपणे दगडफेक केली.
त्यात मोटारसायकल, किराणा दुकान व खानावळ मधील फर्निचरची तोडफोड करुन खानावळीच्या मालकासही मारहाण केली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी योगेश जाधव यांच्या फिर्यादीवरुन गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मंडे हे करीत आहेत.