राजुरी : प्रवरा परिसरातील एका शाळेत गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शाळा भरण्याच्या वेळेस मुलांमध्ये चांगलीच हाणामारी झाली.
यामध्ये एक विद्यार्थी बेशुद्ध पडला असून याप्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. प्रवरानगर येथील एका शाळेत गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शाळा भरण्याच्या अगोदर शाळेतील मुलांमध्ये चांगल्याच हाणामारी झाल्या असून यामध्ये मारहाण झालेला मुलगा बेशुद्धावस्थेत पडला होता.
त्यानंतर तेथे ऑफिसमध्ये उपस्थित असणाऱ्या शिक्षकांना कळताच त्यांनी या मुलाला शाळेच्या ऑफिसमध्ये नेले. ज्या मुलांमध्ये हे हाणामारीचे प्रकरण घडले अशा मुलांना शाळेच्या शिक्षकांनी बोलावून समज दिली असल्याचे बोलले जात असून या शाळेच्या परिसरात अनेक छोट्या मोठ्या घटना घडत असून यामध्ये शाळेत जाणाऱ्या मुलींच्या छेडछाडीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
याला मध्यंतरी कुठेतरी पायबंद घालण्यात स्थानिक असणाऱ्या कारखान्याच्या सिक्युरिटी ऑफिसरला मोठे यश आले होते परंतु मध्यंतरी दिवाळीची सुट्टी होती ती संपल्यानंतर पुन्हा शाळा सुरू झाल्यामुळे अशा शाळेत टारगटपणा करणाऱ्यांना मुलांना पुन्हा पेव फुटले असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहेत.
अशा पद्धतीने अनेक शाळेच्या परिसरात सध्या टारगट मुलांचे व शाळेत जाणान्या मुलांच्या गटामध्ये तुफान हाणामारी होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत असून यात स्थानिक नागरिक व शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाने प्राचार्य शिक्षक यांनी यात तात्काळ लक्ष घालून अशा हाणामान्य करणाऱ्या टारगट मुलांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या शाळेत जाणाऱ्या मुला मुलींच्या पालकांनी केली असल्याचे समजते.
अशा शाळेच्या आवारात घडणाऱ्या घटनांना वेळीच पायबंद घालून शाळेतील मुलांना हाणामारी होणार नाही याची दक्षता लवकरात लवकर घ्यावी अन्यथा एखाद्या वेळेस मोठा अनर्थ घटना घडण्याची शक्यता अनेक नागरिकांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे शाळेच्या प्रशासन आणि मुला – मुलींच्या पालकांनी यामध्ये लक्ष द्यावे अशी अपेक्षा अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.