अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- गाई व म्हशींच्या आरोग्याची काळजी घेतल्यास उच्च प्रतिचे व जास्त दूध उत्पादन मिळू शकते.
त्यामुळे जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगत पशुधनामधील संसर्गजन्य लाळ खुरखत रोग नियंत्रणासाठी जनावरांचे लसीकरण करून घेण्याचा आवाहन तालुका पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी सांगितले.
केंद्र सरकार पुरस्कृत पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत संसर्गजन्य रोग नियत्रंणासाठी पारनेर येथील पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १ ते १५ सप्टेबर दरम्यान जनावरांच्या लसीकरणाची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेस सभापती गणेश शेळके, तालुकास्तरीय सनियंत्रण समितीच्या अध्यक्षा, तहसिलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत बुधवारी प्रारंभ झाला.यावेळी शेळके यांनी शेतकरी वर्गाला लसीकरणासंदर्भात आवाहन केले.
शेळके म्हणाले, पशुपालकांना आपल्या व्यवसायात मोठया प्रमाणात अडचणींना सामन करावा लागतो. दूध उत्पादन व गुणवत्तेबरोबरच जनावरांचे आरोग्य सर्वात महत्वाचे आहे.
जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत आपणास टिकायचे असेल तर आपल्या दुग्धजन्य उत्पादनाची गुणवत्ता वाढवावी लागेल. त्यासाठीच जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
विशेषतः लाळया खुरखत या आजाराची सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे असून संसर्गजन्य असलेल्या या आजाराची इतर जनावरांनाही तात्काळ लागण होण्याची भिती असते.
त्यामुळे या लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवून लसीकरण करून घेण्याचे अवाहन सभापती शेळके यांनी केले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved