अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : कोरोनाच्या लोकडाऊनचा मार तूर, कापसाचे शासनाने केलेले बेहाल, कागदावरच राहिलेली कर्जमाफी, आणि पीक कर्ज मागणा-या शेतक-यांचा बँकामध्ये होत असलेला अपमान यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
तेंव्हा वेळ पडली तर कर्ज काढा परंतु शेतकयांना खरीप हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून द्या तसेच या प्रश्नी बँकांच्या दारात उद्यापासून आमदार बबनराव पाचपुते यांचे मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या साथीमुळे योग्य ती काळजी घेऊन आंदोलन करणार असल्याची माहिती श्रीगोंदा तालुका भाजपा तालुकाध्यक्ष सह भाजपा पदाधिकारी यांनी आज तहसीलदार यांना निवेदन देऊन केली.
यावेळी संदीप नागवडे, भाजपा महिला तालुकाध्यक्षा सौ.सुहासिनी गांधी, गणेश झीटे, दीपक शिंदे, संतोष खेतमाळीस, नगरसेवक शहाजी खेतमाळीस, अंबादास औटी, महावीर पटवा, राजेंद्र उकांडे, दीपक हिरणावळे, उमेश बोरुडे इ.उप.होते.
कर्जमाफी आणि पीककर्ज या मुद्यावर दि.२२ जून २०२० रोजी भाजपाने राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून त्याच धर्तीवर शेतकी-यांच्या विविध प्रश्नावर श्रीगोंदा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी हे हि आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदार यांना आज देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, दोन लाख रुपयां पर्यत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली परंतु सहा महिने झाले अनेक शेतक-यांना कर्जमाफी चे पैसे मिळाले नाहीत.
काही शेतकी-यांची तर यादीत नावेच आलेली नाहीत तसेच राज्यात कोरोनाचे संकट आहे म्हणून पाऊस, खरीप हंगाम आणि शेतीची कामे थांबत नाहीत राज्य सरकारचा बांधावर खत आणि बियाणे या योजनेचा तर पूर्णतः बोजवारा उडालेला आहे, राज्यात लाखाच्यावर शेतकयांचा कापूस घरातच पडून आहे,
मजबुरीने शेतक-याना सदरचा पडून असलेला कापूस व्यापा-याना कमी भावात विकावा लागत आहे, शेतक-या कडे पडून असलेला हरभरा खराब होण्याची वेळ निर्माण झाली आहे , शेतक-याना खरीप पीक कर्ज नाही, कापसाचे, तुरीचे, हरभा-याचे पैसे आलेले नाहीत, शेतक-यांनी बियाणे, खते, मजुरी, साठी पैसा कसा उपलब्ध करायचा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड कारणा-या शेतक-यांना पन्नास हजार रुपये प्रोसाहन निधी देण्याची केलेली घोषणा हि हवेत विरते कि काय अशी परिस्थितीत निर्माण झाली आहे. शेतक-यांची इतकी दयनीय अवस्था आज पर्यत कधीच झाली नाही, पीक कर्ज मागणा-या शेतक-यांचा बँकामध्ये वारंवार अपमान व हेळसांड होत आहे त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात असून तो हवालदिलझाला आहे.
महाविकास आघाडी सरकारने २२ मे २०२० रोजी आदेश काढला व शासनाजवळ निधी नसल्याने शेतक-यांच्या खात्यात शासन रक्कम भरू शकत नाही याची कबुली देऊन शासनाच्या नावे कर्ज मांडावे असे बँकांना सांगितले गेले बँकांनी या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली दोन लाखाच्या वर कर्ज असणा-यासाठी ओटीएस चा आणि नियमित कर्ज भरणा-यास प्रोसाहन अनुदानाचा आदेश आद्यप हि निघाला नाही
मुख्यमंत्र्यांच्या ‘ कर्जवितरणाबाबत तक्रारी नकोत’ या इशा-याला हि बँका जुमानत नाहीत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना हेक्टरी कोरडवाहू २५ हजार, व फळबागांना रु.५० हजार केलेल्या घोषणेचे पुढे काय झाले का सरकार हे हि विसरले आहे.
या शेतक-यांच्या प्रश्नी श्रीगोंदा तालुका भाजपा पदाधिकारी उद्या बुधवार दि.२४ जुन २०२० पासून काष्टी, लोणीव्यकनाथ तसेच कोळगाव येथील राष्ट्रीयकृत बँका समोर आंदोलन करणार आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews